योकोहामा
योकोहामा : जपानमधील प्रसिद्ध औद्योगिक शहर व बंदर. टोकिओ उपसागराच्या पश्चिम किनाऱ्यावर होन्शू बेटावर,टोकिओच्या नैऋत्येस सु. ३० किमी.वर ते वसले आहे. लोकसंख्या २७,७३,८२२ (१९८१). लोकसंख्येच्या दृष्टीने ते जपानचे चौथ्या क्रमांकाचे शहर असून कानागावा विभागाची येथे राजधानी आहे. योकोहामा व कावासाकी या दोन शहरांमुळे औद्योगिक संकुलनिर्माण झाले आहे.